@maharashtracity
परिवहन मंत्री अनिल परब यांची यशस्वी मध्यस्थी
मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब (Transport minister Anil Parab) यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप दुसऱ्या दिवसाच्याअखेर मागे घेतला आहे. (ST employees withdrew agitation)
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला. याआधी या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. तो 27 टक्के वाढवून देण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकताच जाहीर केला होता.
या वाढीला एस टी कर्मचाऱ्यांनी नकार देत सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, अशी त्यांची मागणी होती. या आणि अन्य मागण्यांसाठी एस टी कर्मचारी ऐन दिवाळी च्या आधी संपावर गेल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली होती.
मंत्री अनिल परब यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महागाई भत्ता 28 टक्के करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
याशिवाय घरभाडे भत्ता 8 टक्के, 16 टक्के आणि 24 टक्के असा करण्याची मागणी अनिल परब यांनी मान्य केली. या आधी हा भत्ता 7 टक्के, 14 टक्के आणि 21 टक्के असा मिळत होता.
अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग नगरपालिका क्षेत्राप्रमाणे हा घर भाडे भत्ता दिला जातो. या दोन्ही प्रमुख मागण्या मंजूर झाल्याने एस टी कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला.
दरम्यान, वेतनावाढीचा (Hike in salary)’दर सध्याच्या 2 टक्क्यावरुन 3 टक्के करावा या मागणीवर दिवाळीनंतर बैठक घेऊ, अशी ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.