@maharashtracity

मुंबई: इतर मागासवर्ग समाजाचे राजकीय आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेला इमेपरिकल डाटा केंद्र सरकार उपलब्ध करून देत नसल्याने याबद्दल सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या ठरावावरील चर्चेने विधनसभेत गंभीर वळण घेतले. विरोधी भारतीय जनता पक्ष सदस्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याशी सभ्य वर्तन केल्याची खंत पीठासीन अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. याचा आधार घेत भाजपच्या १२ सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव आज विधानसभेने मंजूर केला.

पीठासीन सभापती भास्कर जाधव यांच्या निवेदनानंतर संसदीय कार्यमंत्री ऍड अनिल परब यांनी १२ सदस्यांच्या एक वर्षासाठी निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला.

निलंबित झालेले सदस्य आणि त्यांचा मतदारसंघ याप्रमाणे – पक्ष प्रतोद आशिष शेलार (बांद्रा पश्चिम), पराग अळवणी (विले पार्ले – पूर्व), राम सातपुते (माळशिरस), संजय कुटे (जळगाव जामोद), अभिमन्यू पवार (औसा, लातूर), गिरीश महाजन (जामनेर, जळगाव), अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), हरिष पिंपळे (मुर्तिजापूर), जयकुमार रावल (शिंदखेडा), योगेश सागर (चारकोप), नारायण कुचे (बदनापूर), किर्तीकुमार भांगडीया (चिमूर). या निलंबित सदस्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनास उपस्थित राहता येणार नाही. तसेच या दोन्ही ठिकाणी विधानभवन परिसरात देखील या सदस्यांना प्रवेश नसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here