@maharaahtracity

पुणे: पुणे शहरातील आंबील ओढा येथील झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या झोपडपट्टी धारकांची सोसायटी निर्माण करावी. तसेच पावसाळ्यात येथील रहिवासांचे स्थलांतर करू नये, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी दिल्या.

पुनर्वसन कामात प्रगती नसल्याने या रहिवाशांनी डॉ गोऱ्हे यांना निवेदन दिले होते. डॉ गोऱ्हे यांनी
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पुणे मनपा (PMC) आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली.

आंबील ओढा येथील नाला वळविण्यासाठी विरोध असल्याची नोंद करून घेण्याचे निर्देश देऊन प्रायमो संस्थेच्या अहवालावर माहिती मांडण्याचे आदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिली. या रहिवाशांची कोअर समिती स्थापन झाली आहे. पुनर्वसनात वसाहतीबाहेरील व्यक्ती आढळयास संबंधित व्यक्ती आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी पुढील मुद्यांवर अधिकाऱ्यांना सूचना देऊन योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केल्या.
★ आंबील ओढ्याचा मार्ग बदलणार याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. नैसर्गिक ओढ्याचा मार्ग किंवा नाल्याच्या मार्ग बदलल्याने काही ठिकाणी मोठा विध्वंस झाल्याचे आपल्या समोर उदाहरणे आहेत. त्यामुळे ओढाचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू नये.
★ पर्यावरणाचा ऱ्हास करून अशा बेकायदेशीर पद्धतीने ओढ्याचा मार्ग बदलून किंवा नाला हटवून सदरील प्रकल्प लादण्यात येऊ नये. तेथील नागरिकांचे पुनर्वसन करून मगच पुढील कार्यवाही करण्यात यावी.

तसेच झोपडपट्टीवासीयांच्या पात्रता यादीत अनेक त्रुटी दिसल्याने यादी व संमतीपत्रे पारदर्शक पद्धतीनेच तपासण्याचा निर्णय राजेंद्र निंबाळकर यांनी घेतला .
★ पुणे महानगरपालिका यांनी आंबली ओढा येथील झोपडपट्टीची जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना दिली आहे का..? याबाबत प्रश्न निवेदनात विचारून मशाल संस्थेने जो सर्व्हे केला होता त्याची प्रत उपलब्ध करून त्यातील सूचनांवर योग्य कार्यवाही करण्याची सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here