स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकही स्वबळावर लढवावी

@maharashtracity

मुंबई: महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांसह (Local bodies) आगामी विधानसभा निवडणुका (assembly polls) काँग्रेस (Congress) पक्षाने स्वबळावर लढवल्या पाहिजेत ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC Chief Nana Patole) यांची भूमिका रास्तच आहे. पटोले यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असून आपले या भूमिकाला समर्थन असल्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका (municipal corporation), नगरपालिका (municipal council), जिल्हा परिषद (ZP) निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे, असे नसीम खान म्हणाले.

काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवल्यास त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव प्राप्त करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घेतली भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे, असेही नसीम खान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here