मुंबई

नववर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. 31 डिसेंबरला (New Year 2024) काय करायचं, याची तयारी घराघरांमध्ये सुरू झाली आहे. अशातच आता राज्य सरकरने मद्यप्रेमींसाठी खूशखबर दिली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने मद्यविक्रींच्या दुकानांच्या वेळेत सूट देण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्रीची परवानगी दिली आहे. 139 (1) (C) आणि कलम 143) (2) (H) (4) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्ताने या तीन दिवस दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय बिअर बार रात्री 12 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राबाहेरील क्लबला रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी दिली आहे. विदेशी मद्याची किरकोळ विक्री करणारी दुकाने मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here