मुंबई
कांदा पदार्थांमध्ये घातल्याने चव अधिक वाढते. अगदी भाजी केली नसेल आणि ताजीत चिरलेला कांदा दिला तरी जेवणाची मजा येते. भाज्यांपासून कोणत्याही मसालेदार पदार्थांमध्ये कांदा आवडीने घातला जातो. मात्र अतिरिक्त प्रमाणात कांदा खाण्याचे दुष्परिणामही असतात. त्यामुळे एका दिवसात किती कांदा खाऊ शकतो याबाबत जाणून घेऊया
पचनासंबंधित त्रास
अतिरिक्त प्रमाणात कच्चा कांदा खाल्ल्याने काहींना पचनासंबंधित त्रास होऊ शकतो. फ्रुक्टेन एक प्रकारचा कार्बोहायड्रेट असतो, ज्यामुळे कांदा पचायला त्रास होऊ शकतो. परिणामी पोटात गॅस, सूज किंवा इतर त्रास उद्भवू शकतो. आधीच पोटाचा त्रास असणाऱ्यांनी कांदा प्रमाणात खावा.
तोंडाची दुर्गंधी
कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी येते. हा दुर्गंध बऱ्याच काळापर्यंत राहतो.
एलर्जी
काहींना कच्च्या कांद्याची एलर्जी असते. परिणामी त्यांना खाज-सूज येणं किंवा श्वास घ्यायला अडचण जाणवू शकते. जर तुम्हाला कच्चा कांदा खाल्ल्यानंतर काही त्रास जाणवत असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं.
छातीत जळजळ होणे
अनेकांना कच्चा खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होऊ शकते. अशांनी प्रमाणात कच्चा कांदा खावा, त्यातही रात्रीच्या वेळेस कच्चा कांदा खाणं टाळावं
हा त्रास असेल तर कांदा खाऊ नका
जे हृदय, उच्च रक्तदाब, किंवा मधुमेशासंबंधित औषधं घेत असतील त्यांनी अतिरिक्त प्रमाणात कच्चा कांदा खाऊ नये. यामुळे शारिरीक त्रास वाढू शकतो. भाज्यातही एक किंवा दोन पेक्षा जास्त कांदा घालू नये.