Twitter : @milindmane70
महाड
दसरा सणानिमीत्त घर आणि आपल्या व्यवसायाचे ठिकाण, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवले जाते. याकरीता बाजारात याच दरम्यान तयार होणारा गोंडा मोठया प्रमाणात विक्रीस उपलब्ध होतो. महाडमध्ये दसरा सणाकरीता एका दिवसातच जवळपास 20 टन झेंडू बाजारात दाखल झाला आणि हातोहात विक्री देखील झाला. लाल पिवळया रंगातील झेंडूच्या फुलांनी रांगोळया काढण्यासाठी आणि झेंडूच्या माळांकरीता हा झेंडू मोठया प्रमाणात खरेदी करण्याकरीता एकच गर्दी झाली होती.
पश्चिम महाराष्ट्रांतील सातारा, सांगली, कोल्हापुर, पुणे, जेजूरी, बारामती, निरा, येथुन झेंडू फुलांची आवक केली जाते. कलकत्ता आणि नामधारी अश्या दोन प्रकारांमध्ये झेंडूच्या फुलांची आवक केली जाते. परंतु सर्व साधारण कलकत्ता जातीची फुलांची अधिक आवक करण्यांत येत आहे. राज्यांतील बहूतांशी व्यापारी जेजूरी, निरा, वाशी मार्केट, बारामती, पुणे या ठिकाणांहून फुलांची खरेदी करतात. यांतील बराचसा माल मुंबईतील वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.
या वर्षी फुलांची आवक बऱ्यापैकी असली तरी शेतकऱ्याला समाधानकारक दर मिळत नसल्याचे सांगण्यात आले. महाडमध्ये झेंडू फुलांची विक्री करण्यासाठी भोर, सासवड, येथुन कांही शेतकरीदेखिल आले असून पावसामुळे फुलांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने जिल्ह्याच्या मार्केटमध्ये दर मिळत नाही, त्या साठी गावा – गावांमध्ये जाऊन फुलांची थेट विक्री करावी लागते. यामध्ये झालेला खर्च जेमतेम हाती लागत असल्याचे फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. झेडूची फुले फार काळ टिकत नाहीत. चोवीस तासांमध्ये फुले सुकून जातात आणि त्यामुळे नुकसान होते. जो दर येईल त्या दरांमध्ये फुलांची विक्री करुन हाती मिळेल त्या पैश्यावर समाधान मानावे लागते. या वर्षी महाडच्या बाजारपेठेमध्ये दोनशे पेक्षा अधिक फुलांची दुकाने थाटण्यांत आली असुन वीसटना पेक्षा अधिक फुले विक्रीसाठी आहेत. सर्व साधारण पन्नास ते साठ रुपये किलोने विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दसऱ्यानिमित्त व्यापारी दुकानांतील वजन काट्यांची पुजा करतात, फुलांची तोरणे लावली जातात, लहानपणी शाळेंमध्ये मुले सरस्वती पुजन करण्यासाठी आवर्जुन जात असत, परंतु कालमानाप्रमाणे आता शाळेमध्ये सरस्वती पुजनाचा कार्यक्रम केला जात असला तरी हा कार्यक्रम सार्वजनिक करण्यात येतो. याकरीता देखील झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. शिवाय वाहनांना सजवण्यासाठी किंवा वाहनाची पूजा करण्यासाठी झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. महाड शहरांतील शिवाजी चौक परिसरांमध्ये बहूतांशी फुलांची दुकाने रस्त्याच्या बाजुला मांडण्यात आली आहेत. दोनशेपेक्षा अधिक झेंडू फुलांची दूकाने महाड आणि औद्योगिक परिसरात थाटण्यांत आली आहेत. साधारण पन्नास रुपयांपासून ऐशी रुपयांपर्यत प्रति किलो या दराने फुलांची विक्री अपेक्षित आहे. मात्र, यावर्षी किमान १०० रुपये दराने विक्री होत आहे.