By Anant Nalavade

Twitter : @NalavadeAnant

मुंबई: अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. ते राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांसह शिवसेना, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांना पक्षाचे नवे प्रतोद आणि विरोधी पक्षनेते म्हणून निवडण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर आव्हाडांना मोठा धक्का बसला आहे.

विरोधी पक्षनेते म्हणून आव्हाडांचं नाव घोषित होताच माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा प्रमुख आनंद परांजपे अजित पवारांच्या गोटात सामील झाले असून आनंद परांजपे यांनी थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर सोमवारी हजेरी लावली.

हा जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली फूट रोखण्याचं मोठं आव्हान आता शरद पवारांसमोर आहे. अजित पवार यांनी ८ नेत्यांसोबत शपथ घेतल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचंही त्यांनी म्हटलं असून ,मी पुन्हा एकदा जनतेमध्ये जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी पुण्यात शक्तिप्रदर्शन करीत कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचंही दर्शन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here