Twitter : @maharashtracity

मुंबई: विक्रोळी रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर इक्बाल अहमद अब्दुल गफार खान व बुकिंग क्लार्क जितेंद्र पाटील यांना प्रवाशाच्या तक्रारीवरून मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्यातून माजी आमदार मंगेश सांगळे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ही घटना २०११ च्या डिसेंबर महिन्यातील आहे. यावेळी प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवरून मारहाण केल्याचा व तोडफोडीचा गुन्हा मंगेश सांगळे आणि इतर दोघांवर दाखल करण्यात आला होता.

मात्र, कोणतेही योग्य आणि सढळ पुरावे न मिळाल्याने या गुन्ह्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्प्ष्ट झाल्याने १२ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला. माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या बाजूने जेष्ठ वकील चैतन्य पेंडसे व विनायक पाटिल यांनी दाव्याचे कामकाज पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here