By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

नागपूर: वन्यप्राण्यांकडून होणार्‍या शेतपिक हानीविषयी शासन नवीन धोरण आखत आहे. तीस दिवसांत हानी भरपाईची रक्कम मिळाली नाही तर संबंधित अधिकार्‍यांच्या वेतनातून व्याजासह भरपाई वसूल करून रक्कम देण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने याविषयी कार्यवाही केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी. जाहीर केले.

मुनगंटीवार म्हणाले, मागील ५-६ वर्षांत राज्यातील वन्यप्राण्यांची संख्या तीपटीने वाढली. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत वन्यप्राण्यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होते. पिकांची हानी टाळण्यासाठी जैव कुंपण, रोजगार हमी योजनातून निधीची तरतूद, झटका यंत्र, बांबूंचे कुंपण, तारेचे कुंपण आदी विविध उपायांचाही विचार करण्यात येत आहे. यापूर्वी शेतीपिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये इतकी हानी भरपाई दिली जात होती, ही रक्कम ५० हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here