By मिलिंद माने

Twitter: @milindmane70

महाड: महाड तालुक्यात ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून अर्ज छाननीत एकूण चार अर्ज अवैध ठरविण्यात आले. यात सरपंच पदासाठी एक अणि सदस्य पदासाठी एकूण तीन अर्ज अवैध ठरले.

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ( Gram Panchayat elections) दिनांक २ डिसेंबर रोजी सरपंच पदासाठी २१६ तर सदस्य पदांसाठी ९५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी अर्जांची छाननी होती. त्यामध्ये सरपंचपदाच्या अर्जावर दोन ठिकाणी आणि सदस्यपदाच्या अर्जावर तीन ठिकाणच्या ग्रामपंचायतमधून हरकती घेण्यात आल्या होत्या.

महाड (Mahad) तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुक होत असून २८ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होत. या कालावधीत सरपंच पदांसाठी ३११ तर सदस्य पदांसाठी १२८५ अर्ज दाखल झाले होते.

चिंभावे, रावतळी, वरंध आणि शिरवली या ग्राम पंचायतमध्ये सरपंच आणि सदस्य पदाच्या उमेदवारासंदर्भात हरकती आल्या. यामध्ये शिरवली, रावतळी,आणि वरंध येथे प्रत्येकी एक सदस्य अवैध ठरवण्यात आले. तर चिंभावेमध्ये कागदपत्राची पूर्तता असल्याने हरकत अर्ज वैध ठरवण्यात आला. रावतळी येथील सरपंचपदाचा उमेदवार अर्ज अवैध ठरवण्यात आला.

महाड तालुक्यात दिनांक १८ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी २१५ अर्ज कायम राहिले असून सदस्यपदाच्या उमेदवारीसाठी तीन नावे कमी झाले आहेत तर ९५३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. येत्या ७ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. यामध्ये कोणत्या ग्रामपंचायतीसाठी कोणते उमेदवार अर्ज मागे घेतील, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here