@maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी १८८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८१,३३,६८२ झाली आहे. काल २९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८३,८६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,४१८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
राज्यात मंगळवारी दोन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५३,६९,९६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३३,६८२ (०९.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत ४४ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ४४ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,५३,५५६ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७४१ एवढी झाली आहे.