@maharashtracity

मुंबई: उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव येथील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न सुटला नसल्याने स्थानिक शिवसेनेचे आमदार कैलास पाटील हे गेल्या ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे कृषिमंत्री या नात्याने शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करुन शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळवून द्यावी. तसेच आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सोडवावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना पत्र लिहून केली आहे.

सध्या पीक विम्याबाबत एका जिल्ह्यात हा प्रश्न समोर आला आहे, तसाच तो राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही असू शकतो याकडे अंबादास दानवे यांनी कृषिमंत्री यांचे लक्ष वेधले आहे. तसेच संबंधित बजाज अलायंस (Bajaj Allianz) या पीक विमा इन्शुरन्स (crop insurance) कंपनीसह सर्व पीक विम्या कंपन्यांना राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा भरपाई देण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी मागणीही दानवे यांनी कृषिमंत्री सत्तार यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here