@maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून साप्ताहिक साथरोग अहवाल सांगण्यात येतो. या अहवालानुसार मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्ल्यू या साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत घटले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसांत साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आल्याने मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू रुग्णांमध्ये घट दिसून येत आहे. तर चिकनगुनीयावर पूर्णतः नियंत्रण असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
या साप्ताहिक साथीच्या आजारांच्या रुग्ण (patients of epidemic disease) संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली असताना या आठवड्यात दिलासादायी चित्र दिसून येत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसांत रुग्ण संख्येत घट झाली आहे. मलेरिया १२०, डेंग्यू (Dengue) ७८, लेप्टो (Leptospirosis) १८, स्वाईन फ्ल्यूचे (swine flue) ६ रुग्ण आढळले. मात्र, सप्टेंबर महिन्यात हेच चित्र विरुद्ध होते.
दरम्यान, मलेरिया (maleria) डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. ताप, उलटी जुलाब होत असल्यास पालिकेच्या हेल्थ पोस्ट, दवाखाने व रुग्णालये येथे मोफत तपासणी करुन घ्यावी, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
१ ते ९ ऑक्टोबरपर्यंत आकडेवारी
मलेरिया १२०
डेंग्यू ७८
लेप्टो १८
गॅस्ट्रो ७७
कावीळ ९
स्वाईन फ्ल्यू ६
चिकनगुनीया ०