भाजप नेते आशीष शेलार यांचा आरोप

ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून शिवसेनेवर टीका

By अनंत नलावडे

@maharashtracity

मुंबई: ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat elections) भाजपला राज्यभरात अभुतपूर्व यश मिळाले आहे. भाजप (BJP) हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपला मिळाले आहे, असा दावा करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेला संपविण्याचा घाट घालत असल्याचा आरोप येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष (NCP) हा राज्यातला दोन नंबरचा पक्ष झाला असून शिवसेना Shiv Sena) पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला आहे. हीच भीती अणि संशय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) व्यक्त केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवू पाहत आहे, हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आतातरी उद्धव ठाकरे यांचे डोळे उघडतील, अशी आशा करुया, असा टोलाही शेलार यांनी लगावला.

भाजपकडे पहिल्यांदाही मराठी मतं होती, आजही आहेत. ज्यावेळेला शिवसेनेने असा दावा करायला सुरुवात केली की, गणेशोत्सव म्हणजे आम्ही, दहीहंडी म्हणजे आम्ही, त्यांना आता भाजपाने सत्याचा आरसा दाखविला आहे. भाजप सणात कधीही राजकारण आणत नाही. सणात केवळ आम्ही सहभाग घेतो. यावर्षी दहीहंडी असो वा गणेशोत्सव, त्यात मुंबईतील मंडळाची सहभागिता कुणाच्या बाजूने आहे हे दिसले, असाही टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

या स्पर्धेची तुलना आम्हाला करायची नाही. पण मुंबई महानगरपालिकेच्या स्पर्धेत ८० मंडळे सहभ्रागी झाली. याउलट मुंबई भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत तब्बल १ हजार २६ मंडळांनी सहभाग घेतला. इतरांपेक्षा भाजपच्या स्पर्धेला दहा पट सहभागिता मिळाली, असे शेलार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here