@maharashtracity
मुंबई: गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मुंबईतील लेप्टोच्या (Leptospirosis patients) रुग्णांत वाढ दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत केवळ लेप्टोचे सहा रुग्ण होते, आता ११ सप्टेंबरपर्यंत मुंबईत १८ लेप्टोचे रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे. या महिन्याच्या अखेरीस स्वाईनफ्लू (swine flue) पुन्हा डोके वर काढेल, अशी भीती पालिका आरोग्य विभागाने व्यक्त केली.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील मुंबईतील पावसाळी आजारांची माहिती मंगळवारी पालिका आरोग्य विभागाने जाहीर केली. या आठवड्यात सर्वच पावसाळी आजारात मोठया संख्येने वाढ झाली. आताही मुंबईत काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे लेप्टोचे रुग्ण वाढू शकतात, अशी भीती पालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मलेरिया (maleria), डेंग्यू (dengue), गेस्ट्रॉ (gastro) या आजारात दुसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. हेपेटायटीसचे (hepatitis) दहा नवे रुग्ण आढळून आलेत. चिकनगुनियाचा केवळ एक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आजार ४ सप्टेंबर ११ सप्टेंबर
मलेरिया ८९ २०७
लॅप्टो ६ १८
डेंग्यू २९ ८०
गेस्ट्रॉ ३८ १२१
हेपेटायटीस ४ १४
चिकनगुनिया १ २
स्वाईन फ्लू ३ ६