@maharashtracity
मुंबई: राज्यात रविवारी १८३२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित (corona patients) रुग्णांची एकूण संख्या ८०,८४,३८३ झाली आहे. काल २०५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण ७९,२४,५४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे (recovery rate) प्रमाण ९८.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ११,६४१ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यात रविवारी दोन कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३८,३८,०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,८४,३८३ (०९.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत ८१८ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ८१८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,३७,४२७ रुग्ण आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,६७३ एवढी झाली आहे.