शहराच्या स्वत:च केलेल्या संकल्पनेला लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने कमानी व बॅनरबाजी करुन हरताळ फासला आहे. कमानी व बेकायदा बॅनरबाजीला मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना देखील शहरात सर्रास कमानी व बेकायदा बॅनर लावण्यात आले असुन पालिकेने मात्र त्याला संरक्षण दिले आहे. रस्ते अडवुन भारलेल्या मंडपांना पालिका – पोलीसांनी आधीच पाठीशी गातले असुन त्यांवर कोणतीच कारवाई केलेली नाही.
कमानी लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जनता दलाचे मिलन म्हात्रे यांनी कमानी व बेकायदा बॅनर विरोधात उच्च न्यायालयात याचीका केली होती. कमानी मुळे रहदारी तसेच वाहतुकीला होणारा अडथळा हे बंदीचे एक प्रमुख कारण आहे. बेकायदा जाहिरात फलक देखील लावण्यास बंदी असुन कायद्याने गुन्हा आहे. महापालिका जशी जबाबदार आहे तसेच पोलीस उपअधिक्षक नोडल अधिकारी आहेत.
त्यातच गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये महासभेनेच ठराव करुन बॅनर बंदी केली होती. बॅनर मुक्त शहर म्हणुन त्यावेळी महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, उपमहापौर चंद्रकांत वैती आदींनी स्वत:चे कौतुक करुन घेतले होते. परंतु आजही शहरात सर्रास याच लोकप्रतिनिधींचे बेकायदा बॅनर व कमानी लागल्या असुन महापालिका आणि पोलीस मात्र त्याला संरक्षण देत आले आहेत.
शहरात गणोशोत्सवाच्या निमीत्ताने आ. मेहतांचे फलक सर्रास झाडांवर तसेच अन्य ठिकाणी बेकायदेशीरपणो लावण्यात आले आहेत. बेकायदा बॅनर सह कमानी सुध्दा लागल्या असुन त्यावर आ. मेहता, आमदार प्रताप सरनाईक, महापौर मेहता आदी लोकप्रतिनिधींचे तसेच पदाधिकारायांचे जाहिरात फलक कमानींवर लागले आहेत. इतकेच काय तर महापालिकेच्या खर्चातुन पालिकेचे फलक देखील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले असुन त्यावर महापौरांचा भला मोठा फोटो तर आयुक्त व उपमहापौरांचे छोटेसे फोटो कोपरायात आहेत. जनतेच्या पैशां मधुन स्वत:ची राजकिय प्रसिध्दी साधली जात असल्याचे आरोप तसेच तक्रारी देखील झाल्या आहेत. सत्यकामचे कृष्णा गुप्ता, जिद्दी मराठाचे प्रदिप जंगम आदींनी अनेक तक्रारी चालवल्या आहेत.
आधीच रस्ते अडवुन महापालिका आणि पोलीसांच्या आशिर्वादाने मंडप उभारण्यात आले आहेत. त्यावर कोणतीच कार्यवाही केली गेली नाही. आता शहरात सर्वत्र बेकायदा कमानीं व बॅनरबाजी चालली असताना देखील पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, अतिरीक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिक्रमण विभाग प्रमुख दादासाहेब खेत्रे व प्रभाग अधिकारायांनी निव्वळ बघ्याची भुमिका घेतली आहे. आयुक्तच बेकायदा कमानी व बॅनरबाजी कारणाराया लोकप्रतिनिधींची जीहुजुरी करत असल्याने आयुक्तांवरच कारवाईची मागणी माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी केली आहे. पोलस उपअधिक्षक यात नोडल अधिकारी असताना ते करतात काय ? असा सवाल म्हात्रेंनी केला आहे.
भाईंदर धक्का बॅनरबाजी मुक्त
लोकप्रतिनिधी आणि महापालिके कडुन चांगला बदल
शहरात सर्रास बेकायदेशीर बॅनरबाजी, कमानी आणि त्यातही लोकप्रतिनिधींचा प्रामुख्याने सहभाग आहे. महापालिका देखील कारवाईस टाळटाळ करतेय. पण त्याच बरोबर काही चांगले बदल देखील यंदा पहायला मिळाले आहेत. भाईंदर पश्चिम धक्का येथे महापालिकेच्या गणोश विसर्जन व्यवस्थे ठिकाणी चमको लोकप्रतिनिधी सर्रास आपले बेकायदा बॅनर लावायचे. हा परिसर बॅनरबाजीने विद्रुप झालेला असायचा. गेल्या वर्षी यावर टिकेची झोड उठली तसेच तक्रारी झाल्या होत्या. यंदा मात्र लोकप्रतिनिधींनी येथील पालिकेच्या मंडप आदी ठिकाणी बॅनर लावलेले नाहित. पालिका प्रशासनाने देखील येथे परखड भुमिका घेतली. जेणो करुन हा परिसर बॅनरमुक्त व स्वच्छ – सुंदर दिसत आहे. भाईंदर धक्का प्रमाणोच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने बॅनर मुक्त सुंदर शहर अशी फसवी घोषणा न करता स्वत:हुन शहरभर काटेकोर अमलबजावणी करावी अशी सुबुद्धी गणपती बाप्पा देवो अशी आशा नागरीकांनी व्यक्त केली आहे.