@maharashtracity

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात यावा, यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर (MLA Dr Balaji Kinikar) यांनी व्यापारी संघाच्या शिष्टमंडळासह पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची अंबरनाथ पूर्व भागातील शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे भेट घेतली. शहरातील गुन्ह्यांच्या वाढत्या गुन्हेगारी (crime in Ambernath) प्रकरणासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

गेल्या काही दिवसांमध्ये अंबरनाथ शहरात घरफोडी, महिलांचे दागिने खेचण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच शहरात दिवसाढवळ्या हत्या होत असून याबाबत नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, याकडे आमदार डॉ किणीकर यांनी लक्ष वेधले.

वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर संपूर्ण शहरभर सी.सी.टी.व्ही. बसविण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी यावेळी केली.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजीभाई धल, सचिव युसुफभाई शेख, डॉ. लापसिया, श्रीमती सुमती पाटील, ईश्वर गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here